बुधवार, २२ मे, २०१३

भाषा

सर्वच काही शब्दांत
सांगता आले असते तर
नजरेची अन स्पर्शाची भाषाच
निर्माण झाली नसती

तू भेटावास

तू भेटावास हा अट्टाहास
मुठीत चंद्रमा घेण्यासारखा होता
पण तू मिळाल्याचा  भासही
हजार सुखावून सुखद होता

रात्रीनंतर दिवस

रात्रीनंतर दिवस
हा तर निसर्गाचा नियम आहे
मग दुखः नंतर सुख
याला मीही थोडीच अपवाद असणार आहे………।

शब्दांनाही कोडं पडावं

शब्दांनाही कोडं पडावं  अशी
नजरेची भाषा खूप काही सांगून जाते
अन शब्दांनीच उत्तर द्यावे
हे हि मग विसरले जाते………


वावटळ

येणारी प्रत्येक वावटळ हि
विध्वंस करणारीच असते असे नाही 
कधी कधी ती वावटाळही 
उंच उडवून गोल गोल फिरवुन यशाच्या दारात भिरकावत असते ………….


मंगळवार, ५ मार्च, २०१३

सुरूचे झाड

 सुरूचे झाड 
 झुकून जमिनीला सलाम करते 
 कारण ......
 जगायचे तर  आधाराला जमीन लागते.

फुलपाखरू

कोवळ्या कोवळ्या पानांना कुरतडून 
सुरवंट कोषात  दडले 
पण आश्च्यर्य  असे कि,
पश्चातापाने  त्याचे सुंदर फुलपाखरू झाले..............